सलमानचा “राधे” होणार चित्रपट गृहातच रिलीज…..

मुंबई, २० जानेवारी २०२१: कोरोना महामारीमुळे एकंदरीत सर्वच क्षेत्रात मोठा  फटका बसला आहे आणि त्या मधे ही कलाकार म्हणजे ज्याचं हतावर पोट असे त्यांची परिस्थिती तर आणखी बिकट झाली. हळूहळू जीवनमान आता पुर्वपदावर येत आहे. सर्वच क्षेत्रातील लोक हे पुन्हा उभा राहण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यामुळे कुठे तरी त्यांना सहारा काम मिळत आसून थोडा दिलासा आहे आणि यामधेच एक दिलासा देणारी गोष्ट आली आहे.

कोरोना मुळे थिएटर व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते. तर अनेक मोठ्या बॅनरचे चित्रपट हे ऑनलाईन ओटीटी प्लॅटफॉर्मवर येत आसल्याने आता भविष्यात थिएटरला कमबॅक करणे अवघड जाणार आसल्याचे चित्र उभे राहीले. म्हणून मध्यंतरी सर्व थिएटर मालकांनी सलमान खान कडे धाव घेत त्याचा आगामी चित्रपट  “राधे” हा चित्रपट गृहातच फिल्म रिलीज करावी अशी मागणी केली होती.

भाईजान चा राधे होणार थिएटरमध्येच रिलीज…..
सलमान खानचा मोस्ट अवेटिंग चित्रपट “राधे” चित्रपट गृहातच रिलीज होणार आहे. सलमानने ईदच्या दिवशी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आसल्याचे सांगितले. या शिवाय सलमानने सर्व थिएटर मालकांना पत्र लिहीत कोरोना काळात खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. थिएटरमध्ये “राधे” पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांच्या आरोग्याची काळजी घेणही गरजेचं आसल्याचे त्यात लिहीले आहे.

चाहते ही आनंदी….
सलमान खानच्या “राधे” चित्रपटाची वाट चाहते आतुरतेने बघत होते आणि त्यातच सलमानच्या या सांगण्यावरून चाहत्यावर्गातील आतुरता आणखी शिगेला पोहोचली आहे. तर येणार्या २०२१ मधे बाॅलिवूड मधे एका पेक्षा एक चित्रपटाची नांदी लागणार असून मनोरंजन क्षेत्रातून प्रेक्षकांना  मेजवानीच मिळणार आहे.तर आता “राधे” बाॅक्स ऑफिसवर येऊन सलमानच्या फ्लाॅपनेस ला बाहेर काढेल का हे पाहणं रंजक ठरणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा