समाज माध्यमांच्या सहाय्याने नाभिक व्यवसायिकाची अनोखी मुलाखत

“कोरोना” माहामारीमुळे निर्माण झालेल्या लॉक डाऊनमुळे परिचित मंडळींच्या घरी येणे जाणे बंद झाले त्यामुळे आपली प्रतक्ष मुलाखत घेता येत नाही म्हणून चला या व्हॉटसॅपच्या प्रसार माध्यमातून माझ्या मनाचे अंतरंग व आपल्याशी हितगुज करावी अशी तीव्र ईच्छा मनात प्रगट झाली. म्हणून हा मार्ग निवडला. तर माझ्या प्रेमळ समाज बांधवांनो…

सर्व प्रसार माध्यमांमध्ये नाभिक समाजाने पुकारलेल्या आंदोलनाची मोठ्या प्रमाणात बातमी आली. सर्व वृत्तपत्रांनी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या झेंड्याखाली प्रदेश अध्यक्ष श्री रविभाऊ बेलपत्रे आणि प्रदेश सरचिटणीस श्री अरुण जमदाडे यांच्या मार्गदर्शनात सलून कारागिरांच्या व ब्यूटी पार्लरच्या मागण्या व दुकान उघडण्यासाठी “माझे दुकान व माझी मागणी” या सदराखाली नागपूरसह विदर्भ आणि संपूर्ण महाराष्ट्रात मूक-प्रदर्शन आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या आंदोलनात समस्त नाभिक समाज बांधव, सलून चालक-मालक, कारागीर तसेच ब्युटी पार्लर चालविणाऱ्या महिलांनी ब्युटीशियननी तर घरातील सर्व कामे बाजूला सोडून स्वयंसुफरतीने आपापल्या दुकानासमोर तीन तास दुपारच्या कडक उन्हात काळी फीत लावून व मागणी पत्राचा हाती फलक घेऊन राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

त्यासाठी सर्व प्रिंट मीडियातील सर्व पत्रकार बंधूंनी तसेच राष्ट्रीय व राज्य स्तरातील प्रदेश न्युज चॅनेल आणि स्थानिक न्युज चॅनेल (इलेट्रॉनिक मीडिया) यांनी भरभरून या आंदोलनाची बातमी संपूर्ण महाराष्ट्रात सतत टीव्हीत काल दाखविण्यात आली. महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येत असलेले नाभिक समाज बांधवांनी व इतर समाज सलून मालकांनी टीव्ही समोर बसून एकाग्रमनाने टक लावून ह्याची देही याची डोळ्यांनी बघितला.

गेल्या कित्येक वर्षांनी समाजाचे काहींना काही समाजकार्य प्रत्येक वर्षात, संपूर्ण महाराष्ट्रात होत गेले किंबहुना समाजाच्या मागण्यासाठी अनेक मोर्चे काढले परंतु कालच्या आंदोलनाची दखल घेऊन महाराष्ट्रातील तमाम न्युज चॅनेल वाहिन्यांनी तसेच प्रिंट मिडीयानी मोठ्या प्रमाणात भरभरून प्रतिसाद दिला . तसा प्रतिसाद अनेक वर्षांपासून अनेक समाज संघटनेने कार्यक्रम राबविले पण एवढा प्रतिसाद मिळाला नाही जेवढा कालच्या पुकारलेल्या आंदोलनास मिळाला. हा एक एेतिहासिक रेकॉर्ड झाला आहे . अर्थात याचे संपूर्ण श्रेय महाराष्ट्रातील तमाम माझ्या समाज बंधू-भगिनींना, कारागिरांना महिला ब्युटीशीयन व जागृत झालेल्या तमाम तरूण युवकांना जातो हे सर्वच गौरवशाली कार्य करून अभिनंदनास पात्र आहेत. पण आपल्याला हेही विसरता कामा नये की कमी वेळात आंदोलनाच्या धाडसी निर्णय घेऊन महाराष्ट्र नाभिक महामंडळ नागपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्री सतीश तलवारकर, नागपूर जिल्हा युवा अध्यक्ष श्री अमोल तलखंडे आणि युवा सरचिटणीस श्री प्रवीण चौधरी यांचा सिंहाचा वाटा आहे हेही विसरता येत नाही तेवढे हे समाजाचे तीन सैनिकांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी जे कार्य केले ते तेवढेच कौतुकास्पद व गौरवशाली आहेत.

लग्न म्हटलं की विघ्ने येतात हे विधीलिखित आहे. आपण समाज कार्य करतो त्यावेळेस काहींना काही विघ्ने येतच असतात. त्यातला असाच प्रकार काल आंदोलनाच्या वेळी घडला.सर्वांच्या परिचित असलेली प्रचलित वाक् प्रचार म्हणजे एकमेकांचे पाय ओढणे. समाजाच्या प्रतिष्ठित नेते मंडळींनी आंदोलनाचा पवित्रा रद्द झाला व अनेक नकारात्मक वाक्यांचे शब्द बोलून सोशल मीडियावर पोस्ट टाकून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेल्या त्यात प्रसार माध्यमांसमोर समाजाची कमजोरी दिसुन आली. एवढ्यानेच ते थांबले नाहीत तर प्रदर्शित करण्यासारखे वक्तव्य बोलून आंदोलनाचा फज्जा उडविण्याचा अशोभनीय प्रकार केला हे समाज नेता म्हणविणाऱ्या नेत्यांना शोभत नाही. हे ही समाज बांधवांनी याकडे जातीने लक्ष देऊन धडा शिकवला पाहिजे हे येथे आवर्जून म्हणावेसे वाटते. यापुढे समाजाच्या उन्नतीकरिता कोणत्याही समाज संघटनेने कार्य केले तर त्यांना सर्वच संघटनांनी मोठ्या उदार अंतकरणांनी सहर्ष पाठिंबा जाहीर करावा व समाजाची शक्ती एकजूटपणे सरकार समोर दाखवावी.

असो, या आंदोलनाला समाजातील सर्वच स्तरातील संघटनेने प्रत्यक्ष व अप्रतक्षपणे या कार्यात उडी घेतली त्या सर्वांचे अभिनंदन आणि त्याव्यतिरिक्त बाहेरील अन्य समाज संघटनेने त्यामध्ये राजकीय संघटना, सामाजिक संघटना, आरक्षण बचाव समिती, विदर्भ मोलकरीण संघटना, विदर्भ राज्य आघाडी (श्री हरी अणे), वंचित आघाडी, अंगणवाडी कर्मचारी सभा, संघर्ष वाहन-चालक संघटना, जय जवान जय किसान संघटना आणि बजरंग दल तसेच छोट्या-मोठ्या संघटनेने पाठिंबा जाहीर केला. त्या सर्वांचे नाभिक बांधवांच्यावतीने तसेच महामंडळाचे व युवा वर्गातर्फे मनपूर्वक आभार व अभिनंदन धन्यवाद.

सुरेश एस चौधरी
नाभिक समाज कार्यकर्ता

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा