सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई, दि.१२जून २०२०: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. धनंजय मुंडे सह त्यांच्या स्वीय सहाय्यकासह अन्य कर्मचारीही बाधित असल्याची माहिती समोर आली आहे.
धनंजय मुंडे राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवार( दि.९) च्या बैठकीत मुंडे सहभागी झाले होते.

या अगोदर राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली होती. या दोन्ही मंत्र्यांनी कोरोनावर मात केली आहे.

त्यामुळे आता राजकीय क्षेत्रातही कोरोनाने शिरकाव केल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यात गेल्या २४ तासांमध्ये ३६०७ नवीन रुग्ण आढळले असून १५२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तसेच मागील २४ तासांमध्ये १५६१ रुग्ण बरे झाले आहेत आणि त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा