पुरंदर : ज्युबिलंटचे सामाजिक क्षेत्रातील काम वाखाणण्याजोगा आहे. ते आरोग्य शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात फाउंडेशन च्या माध्यमातून काम करतात. हे काम करत असताना शासनाने निर्धारित केलेल्या 3% सीएसआर फंडाच्या मर्यादेवर अवलंबून न राहता त्यापेक्षा जास्त निधी कंपनीने लोकहितासाठी वापरावा असे आव्हान पुणे जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांनी गुळूंचे येथे केले. ते मुस्कान डीजे मित्र या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
ज्युबिलंट भरतीया फाउंडेशन यांच्यावतीने नीरा परिसरातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळावे म्हणून मुस्कान डीजे मित्र उपक्रम कार्यान्वित करण्यात आला.
या योजनेचा शुभारंभ गुळूंचे येथे जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी जी.प.सदस्या शालिनी पवार , प्रमोद काकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमर माने, सहाय्यक गट विकास अधिकारी मिलिंद मोरे, गट शिक्षणाधिकारी रामदास वालझडे, धनंजय बडबडे, पुरंदर पंचायत समितीचे माजी सभापती अजीत निगडे , नारायण निगडे, गुळूंचेचे सरपंच संभाजी कुंभार , उपसरपंच संतोष निगडे कर्नलवाडीचे सरपंच सुधीर निगडे,उपसरपंच विकास कर्णवर ज्युबिलंटच्या जनसंकअधिकारी इसाक मुजावर, यांसह ग्रामस्थ शिक्षण व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी नीरा निंबुत सह गुळूंचे,पाडेगाव,कर्नलवाडी, पाडेगावफार्म,पिंपरे,लक्ष्मीनगर,पठारवस्ती,या आसपासच्या पंधरा शाळांमध्ये टॅब,व ईलर्नीग संच वाटप करण्यात आले.
यावेळी ते बोलताना जाधव म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी विद्यार्थ्यांप्रमाणे संगणकाधारित शिक्षण घेण्यासाठी ज्युबिलंटच्या मुस्कान डीजे मित्र हा उपक्रम अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. कंपनीच्या चांगल्या कामाचे कौतुक करत असतानाच . नीरा नदी स्वच्छ व सुंदर आहे ती सुंदर ठेवण्यासाठी कंपनीत चालणारे प्रोजेक्ट विनाअपघात चालवावेत असे अवाहन त्यांनी यावेळी केले.
ज्युबिलंटच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मुस्कान या प्रकल्पाबद्दल बोलताना कंपनीचे उपाध्यक्ष सतीश भट म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये कंपनी केवळ टॅब देऊन थांबणार नाही, तर याबाबत प्रशिक्षण देण्यासाठी कंपनीच्या वतीने 3 प्रशिक्षिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते आठवड्यातून एकदा प्रत्येक शाळेत जाऊन ई लर्निंग संचद्वारे शैक्षणिक अभ्यासक्रम शिकवणार आहेत. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. पुढील काळात या प्रकल्पाची व्याप्ती वाढवून ग्रामीण भागातील जास्तीत जास्त शाळा या प्रकल्पात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय फाऊंडेशनचे अजय ढगे यांनी केले, तर आभार
दीपक सोनटक्के यांनी मानले