बॉलिवूडमधील आपल्या अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळख निर्माण केलेला अभिनेता म्हणजे इरफान खान. त्याने स्वतःच्या अभिनयाने प्राइक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. त्याने आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिका योग्य पद्धतीने रंगवल्या आहेत. अगदी सामान्य कुटुंबातून आलेल्या या असामान्य व्यक्तिमत्वाला सलाम…आज वाढदिवसानिमित्त काही खास.
इरफान खान यांचा जन्म ७ जानेवारी १९६७ ला राजस्थानच्या जयपुरमध्ये झाला. इरफानच्या वडिलांचा टायरचा व्यवसाय होता. इरफानने पूर्ण नाव साहबजादे इरफान अली खान असे आहे.
१९८४ मध्ये इरफानने दिल्लीच्या ‘नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा’ मधून अभिनयाचे शिक्षण पूर्ण केले. याकाळातच त्याच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे तो फक्त राष्ट्रीय नाट्य विद्यालयाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीवर आपली गुजराण करत होता.
इरफानने अभिनयाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर मुंबईत येऊन ‘चाणक्य’, ‘भारत एक खोज’, ‘सारा जहां हमारा’, ‘बनेगी अपनी बात’, ‘चंद्रकांता’ आणि ‘श्रीकांत’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले.
इरफानने आतापर्यंत पान सिंग तोमर, मकबूल, सलाम बाँबे, लाइफ इन अ मेट्रो, एक डॉक्टर की मौत, हासिल, बिल्लू आदी चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. तसेच ज्युरासिक वर्ल्ड, द अमेझिंग स्पायडरमॅन, द वाँरियर, लाईफ ऑफ पाय या इंग्रजी चित्रपटही भूमिका केल्या आहेत.
जज्बा’, ‘पिकू’, ‘लाइफ ऑफ पाई’, ‘द नेमसेक’, ‘स्लमडॉग मिलेनियर’, ‘हासिल’, ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘तलवार’, ‘ये साली जिंदगी’, ‘यू होता तो क्या होता’, ‘७ खून माफ’, ‘डी-डे’, ‘बिल्लू’, ‘अपना आसमान’, ‘सलाम बॉम्बे’, ‘रोग’, ‘डेडलाइन सिर्फ २४ घंटे’, ‘नॉक आउट’, ‘ए माइटी हार्ट’, ‘किस्सा’, ‘थँक यू’, ‘क्रेजी ४’, ‘चमकू’, ‘राइट या राँग’, ‘चेहरा’, ‘मुंबई मेरी जान’, ‘द किलर’, ‘कसूर’, ‘क्राइम’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत.
इरफान खान यांना २०११ साली पद्मश्री, २००३मध्ये हासिल चित्रपटासाठी फिल्मफेअर सर्वोत्तम खलनायक पुरस्कार, २००७ फिल्मफेअर सर्वोत्तम साहाय्यक अभिनेता पुरस्कार (
२०१२ मध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता (
संघर्षातून तावून सुलाखून निघत अभिनय क्षेत्रात सर्वोच्च स्थानी पोहोचलेल्या इरफान खानला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.