समता प्रतिष्ठान’चा वर्धापनदिन उत्साहात

6

पुणे, १० जानेवारी २०२३ : क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त ‘समता प्रतिष्ठान’, पुणेचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.

सुरवातीला ‘मी सावित्री बोलतेय’ हा एकपात्री प्रयोग भक्ती प्रधान या मुलीने सादर केला. अत्‍यंत  सुंदर असे सादरीकरण तिने केले. सर्व पालक आणि विद्यार्थी तिच्या अभिनयाने मंत्रमुग्ध झाले. अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी नृत्‍य, गायन आणि वक्तृत्‍व याप्रकारे आपली कला सर्वांसमोर सादर केली. मुलींचे नृत्‍य पाहून पालकांनी आणि पाहुण्यांनी विशेष दादही दिली. 

यावेळी अभ्यासिकेतील ५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्‍य वाटप करण्यात आले. त्‍याचबरोबर उत्तम सादरीकरण करणाऱ्या मुलांना पारितोषिकेही देण्यात आली. 
सौ. स्वाती भोसले यांना शारदा महिला संस्थेकडून शिष्यवृत्ती मिळाल्याने त्‍यांचाही सत्‍कार करण्यात आला. 
श्री. हरेश सूळ यांनी सर्व मुलांचे कौतुक केले. ग्रामीण भागात असे उपक्रम नव्हते त्‍यामुळे आम्हाला असे काही शिकायला मिळाले नाही. त्‍याचा परिणाम आत्‍मविश्वास कमी होता; मात्र समता प्रतिष्ठान अभ्यासिकांच्या मार्फत करीत असलेले काम हे अत्‍यंत महत्त्वाचे असून, याचा उपयोग भविष्यात नक्कीच मुलांना होईल. पालकांनी यासाठी लक्ष देणे गरजेचे आहे. त्‍यासाठी काहीही मदत, सहकार्य हवे असेल तर आम्ही करू, असे आश्वासनही त्‍यांनी दिले. डॉ. भक्ती वारे मॅडम, श्रीमती माळी मॅडम यांनी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त करीत ‘समता प्रतिष्ठान’च्या कामास शुभेच्च्छा दिल्या. 

यावेळी या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. हरेश सूळ (अपर तहसीलदार व परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी, खेड), डॉ. भक्ती वारे (होमियोपॅथी), श्रीमती माळी मॅडम (शारदा संस्था), ‘समता प्रतिष्ठान’चे पदाधिकारी व विश्वस्त श्री. शुभम वेळेकर, सौ. रेखा गायकवाड, सौ. अमृता मोरे हे उपस्थित होते. यावेळी ‘समता प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. संदीप मोरे यांनी प्रास्ताविक केले. आजच्या काळातील ‘समता प्रतिष्ठान’च्या कामाची गरज आणि त्‍याकरिता शिक्षणाचे माध्यम का महत्त्वाचे आहे, हे त्‍यांनी सर्वांना सांगितले. ‘समता प्रतिष्ठान’ने वर्षभर केलेल्या विशेष कामे, प्रकल्प याबद्दल माहिती दिली. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशाद शेख व साक्षी जाधव, सानिका सरोज यांनी केले. मदत करणाऱ्या सर्वांचे आभार समृद्धी पाटोळे या विद्यार्थिनीने केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ‘समता प्रतिष्ठान’चे कार्यकर्ते अमन शेख, सम्यक चव्हाण, राज कदम, तनिष्क उबाळे, मयूर ढावरे, सौरभ वेळेकर, प्राजक्ता कांबळे, अदिती साठे, निशांत वाघमारे, साक्षी शर्मा, संतोष शर्मा, कार्तिक शेलार या सर्वांनी सहकार्य केले.

न्यूज अनकट’ प्रतिनिधी : ज्ञानेश्वर अहिवाळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा