संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर थेरगाव येथे संपन्न

पुणे, १ ऑगस्ट २०२० : मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषद यांच्या वतीने पुणे जिल्ह्यात तसेच पिपंरी चिंचवड शहरात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता एक सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान करण्यासाठी जाहीर आवाहन करण्यात आले होते, आणि या आवाहनाला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देत रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी उपस्थिती लावत या शिबिरात ११८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

सदर रक्ताचे संकलन पिपंरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय रक्तपेढी कडून करण्यात आले. शिबिराचे उदघाटन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाअध्यक्ष विशाल तुळवे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी मा. नगरसेवक विनायक गायकवाड, मराठा सेवा संघ केरळ राज्य प्रभारी प्रकाश जाधव, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अजय भोसले, जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषदचे पुणे जिल्हाअध्यक्ष संतोष बादाडे, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे काशिनाथ नखाते, घर बचाव समितीच्या संगीता फुले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

तसेच प्रमुख पाहुणे म्हणून वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, सामाजिक कार्यकर्त्या रोहिनाज शेख, प्रहार संघटनेचे अजिंक्य बारणे हे उपस्थित होते. या वेळी मार्गदर्शन करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी संभाजी ब्रिगेडच्या सामाजिक उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

याप्रमाणे भविष्यात पिपंरी चिंचवड शहरामधील जे कोरोना सारख्या आजारावर मात करून बरे झाले आहेत अशा व्यक्तींनी प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. या शिबिरात संघटनेच्या वतीने संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा कार्यध्यक्ष प्रमोदसिहं गोतारने, सचिव विशाल जरे, संघटक सतीश कदम तसेच छावाचे राजू पवार व गणेश सरकटे, अतुल वर्पे, शिवाजी बोत्रे, विनोद घोडके, मयूर दिवे, दादा कांबळे, बाळासाहेब साने, भय्यासाहेब गजधने, करण रोकडे हे पदाधिकारी उपस्थित होते.

सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर लोभे, परमेश्वर जाधव, संतोष बादाडे, विनय भोसले या कार्यकर्त्यानी अथक परिश्रम घेतले. या रक्तदान शिबिराचे आयोजन संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतीश काळे केले व आभार जिल्हा कार्यध्यक्ष गणेश दहिभाते यांनी मानले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा