घनसावंगी, जालना ३१ मार्च २०२४ : पाणी टंचाईच्या झळा सोसत असलेल्या जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील यावल पिंप्री तांड्यावर, समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी कारखान्यामार्फत मोफत टँकर सुरु करून शेकडो कुटुंबाला दिलासा दिलाय. पाणी टंचाईने ग्रस्त यावलपिंप्री तांड्यावर समृध्दी’चे टँकर आल्यानंतर बंजारा बांधवानी आनंद व्यक्त करत सतीश घाटगे यांचे आभार मानले.
सध्या घनसावंगी तालुक्यातील अनेक गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झालीय. टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे समृध्दी कारखान्यामार्फत मोफत पाणी टँकर सेवा सुरु करून गावकऱ्यांना दिलासा देत आहे.
यावल पिंप्री तांड्यावर पाण्याचा प्रश्न बिकट झाल्याने जनतेची गैरसोय होत होती. गावातील काही नागरिकांनी सतीश घाटगे यांची भेट घेत त्यांच्याकडे समस्या बोलून दाखवली व त्यांच्याकडे पाण्याचे टँकर सुरू करण्याची मागणी केली. घाटगे यांनी गावकऱ्यांची तत्काळ दखल घेऊन कारखान्यामार्फत मोफत पाण्याचे टँकर सुरु केले. यामुळे गावातील नागरिकांनी आनंद व्यक्त करत घाटगे यांचे आभार व्यक्त केले आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी : विजय साळी