सॅमसंग या दिवशी भारतात लॉन्च करणार 108MP कॅमेरा स्मार्टफोन, ही असतील फीचर्स

पुणे, 19 एप्रिल 2022: सॅमसंग भारतात एक नवीन मिड-रेंज स्मार्टफोन Galaxy M53 5G लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. हा स्मार्टफोन नुकताच जागतिक स्तरावर लॉन्च करण्यात आला आहे. Galaxy M53 5G भारतात 22 एप्रिल रोजी लॉन्च होईल.

Galaxy M53 5G सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटसह Amazon India वर विकला जाईल. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 900 चिपसेट देण्यात आला आहे आणि याला 120Hz रिफ्रेश रेटसाठी सपोर्ट देखील मिळेल.

Samsung च्या मते, Galaxy M53 5G भारतात 22 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता लॉन्च होईल. कंपनीने या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यावरही लक्ष केंद्रित केले असून याला 108 मेगापिक्सल्सचा प्रायमरी सेन्सर दिला जाईल. या फोनचे दोन वेरिएंट लॉन्च केले जाऊ शकतात.

Galaxy M53 5G जागतिक स्तरावर लॉन्च करण्यात आला आहे, त्यामुळं फोनची वैशिष्ट्ये स्पष्ट आहेत. या फोनमध्ये 6.7-इंचाची फुल HD+ AMOLED स्क्रीन असेल. या फोनमध्ये चार रियर कॅमेरे दिले जातील. प्रायमरी लेन्स 108 मेगापिक्सेल असेल, दुसरी 8-मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड लेन्स असेल, तर 2-मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला जाईल.

Galaxy M53 5G मध्ये सेल्फीसाठी 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल. या फोनमध्ये 8GB रॅम असून त्याची इंटरनल मेमरी 128GB आहे. या स्मार्टफोनला Android 12 आधारित One UI 4.1 दिले जाईल.

Galaxy M53 5G मध्ये 5,000mAh बॅटरी पॅक देण्यात आलाय आणि 25W फास्ट चार्ज सपोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात यूएसबी टाइप सी पोर्ट आहे. किंमतीबद्दल बोलायचं झालं तर, हा स्मार्टफोन भारतात 25 हजारांच्या सुरुवातीच्या किंमतीसह ऑफर केला जाऊ शकतो. कंपनी टॉप व्हेरिएंट 30 हजारांच्या आत ठेवण्याचा प्रयत्न करेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा