गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे समूह शाळांमुळे जिल्हा परिषदेच्या ९० शाळाच उरणार विद्यार्थी आणि शिक्षकांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह

समूह शाळांमुळे जिल्हा परिषदेच्या ९० शाळाच उरणार विद्यार्थी आणि शिक्षकांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह

कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे एकत्रीकरण करून ‘समूह शाळा’ करण्याचा राज्य शासनाचा निर्णय कार्यान्वित झाल्याने पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची संख्या ९० पर्यंत घटणार आहे. यामुळे शिक्षक व कर्मचाऱ्यांची पदे कमी होतील. या समूह शाळांमुळे विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी चांगल्या सोयीसुविधा व सुरक्षित वाहतूक व्यवस्था मिळेल, असा दावा प्रशासनाने केला आहे.

मात्र, दूर अंतरावर शाळा भरवल्यास मुलींना शिक्षण अर्धवट सोडावे लागण्याची भीती पालकांकडून व्यक्त होत आहे. तसेच, शिक्षण हक्क कायद्यानुसार (RTE) शाळा घरापासून ठरावीक अंतरावर असणे बंधनकारक आहे, त्याचे उल्लंघन या निर्णयामुळे होत असल्याचे मत व्यक्त होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चंद्रशेखर रहांगडाले

error: Content is protected !!
Exit mobile version