पुरी, २३ जून २०२० : भारतातील सुदर्शन पटनाईक हे जगातील एक प्रसिद्ध वाळू कलाकार आहेत, ज्यांचा जन्म प्रभु श्री जगन्नाथ यांच्या पवित्र भूमीतील मार्कीकोट पुरी (ओडिशा) येथे १९७७ साली गरीब कुटुंबात झाला.
घरातील बिकट परिस्थितीमुळे त्यांना बालपणी शिक्षण घेणे आवाक्याबाहेरचे होते, परंतु नियतीने त्याच्यासाठी वेगळेच ठरवले होते. काळ्या वाळूवर ठसा उमटविण्याच्या प्रयत्नातून निर्मळ समुद्राजवळ काहीतरी राखून ठेवले होते. याच कलेतून पुढे जावून ते आंतरराष्ट्रीय सँड आर्टिस्ट झाले.
राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्थरावर त्यांनी अनेक पुरस्कार मिळवले, वेगवेगळी सामाजिक ,राजकीय , व्यक्तिगत व समाजप्रबोधन वाळू शिल्प बनविण्यात त्यांचा हतखंडा आहे. त्यांच्या या कलेचा सन्मान करत भारत सरकारने २०१४ साली त्यांनी पद्मश्री चा पुरस्कार देवून त्यांचा गौरव केला.
त्यांच्या याच कलेच्या धर्तीवर आज कोरोनाच्या सावटाखाली होणा-या भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेचे सुंदर व विलोभनीय वाळू शिल्प त्यांनी पुरीच्या समुद्र किनारी साकारले आहेत.
या मध्ये भगवान जगन्नाथ त्यांचे मोठे बंधू बलभद्र व बहिण सुभद्रा यांच्या रथांच्या प्रतीकृतीं व्यतिरिक्त देवांचे मुखवटे साकारले असून सर्व श्रध्दाळूंना रथयात्रेच्या शुभेच्छेचा संदेश देखील दिला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी