साने गुरुजी मित्र मंडळाने सामाजिक बांधीलकी जपत केली ५० हजारांची मदत

पुणे, ५ सप्टेंबर २०२०: सानेगुरुजी नगर वसाहती मधील कुटुंबाला ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करून सामाजिक बांधिलकी जपल्याचे दिसून आले. साने गुरुजी तरुण मंडळ व सभागृह नेते धीरज घाटे यांच्या कडून ही मदत करण्यात आली.
सानेगुरुजी नगर वसाहतीमधील सामाजिक कार्यकर्ता म्हणून परिचित असणारे दीपक आडांगळे यांचे काही वर्षांपूर्वी दुःखद निधन झाले होते. आडांगळे कुटुंब अत्यंत सामान्य कुटुंब मागच्या आठवड्यात कैलासवासी दीपक आडांगळे यांच्या पत्नी ज्योती आडांगळे यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि एक मुलगी स्वराज, स्वरांजली आणि शिवराज असा परिवार आहे.
दुर्दैवाने असा प्रसंग कोणावरही येऊ नये, परंतु नियती पुढे कोणाचेही चालत नाही. या कुटुंबावर झालेला आघात निश्चित भरून येण्यासारखा नाही परंतु एक सामाजिक भान जपत आपल्या सानेगुरुजी तरुण मंडळाच्या वतीने पुढच्या काळात कुटुंबाचा उदरनिर्वाह होण्यासाठी ५०,००० रुपयांची आर्थिक मदत स्वरांजली व शिवराज यांच्याकडे गणपती बाप्पांना स्मरून सुपूर्त केली.
तसेच पुढच्या काळात कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी मोठ्या मुलाच्या नोकरीचीही व्यवस्था करून देऊ असे आश्वासनही ह्या वेळी सभागृह नेते धीरज घाटे यांनी दिले. या प्रसंगी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा