दिल्ली: उन्नाव बलात्कार पीडित मुलीच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी माजी आमदार कुलदीपसिंग सेंगर यांना दोषी ठरविण्यात आले आहे. दिल्लीच्या तिस हजारी कोर्टाने बुधवारी निकाल देताना सांगितले की तुमचा तो होती असो किंवा नसो तुमच्या हातून निघृण हत्त्या झाली आहे. या प्रकरणात माजी आमदार कुलदीपसिंग सेंगर यांच्यासह एकूण ११ आरोपी होते. यापैकी ४ जण निर्दोष मुक्त झाले आहेत. उर्वरित ७ जणांना पीडितेच्या वडिलांच्या मृत्यूबद्दल कोर्टाने दोषी ठरविले आहे. १२ मार्च रोजी शिक्षा जाहीर केली जाईल. तीस हजारी कोर्टाने कुलदीप सेंगरला कलम ३०४ आणि १२० बी मध्ये दोषी ठरवले आहे.
आरोपी कुलदीप सेंगरसह दोषी ठरलेल्या ७ जणांपैकी दोघे यूपी पोलिसांचे अधिकारी आहेत. एक एसएचओ आहे, दुसरे सब इन्स्पेक्टर आहेत.
सीबीआय आणि वकीलांनी कौतुक केले
निर्णय देताना न्यायाधीश म्हणाले की, माझ्या आयुष्यातील सर्वात आव्हानात्मक खटला होता. न्यायाधीशांनी सीबीआयचे कौतुक केले. पीडितेच्या वकिलाचेही कौतुक झाले.
दोषारोप
१- कुलदीप सेंगर – दोषी
२- कामता प्रसाद, उपनिरीक्षक – दोषी
३- अशोकसिंग भदौरिया, एसएचओ – दोषी
४ – शैलेंद्र सिंह उर्फ टिंकू सिंग – निर्दोष मुक्त
५- विनीत मिश्रा उर्फ विनय मिश्रा – दोषी
६- बीरेंद्रसिंग उर्फ बुवा सिंह – दोषी
७- राम शरणसिंग उर्फ सोनू सिंग – निर्दोष मुक्त.
८- शशी प्रताप सिंह उर्फ सुमन सिंग – दोषी
९- अमीर खान, हवालदार – निर्दोष मुक्त
१०- जयदीपसिंग उर्फ अतुल सिंग – दोषी
११- शरदवीर सिंग – निर्दोष मुक्त
काय आहे प्रकरण:
९ एप्रिल २०१८ रोजी उन्नाव बलात्कार पीडित मुलीच्या वडिलांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. या प्रकरणातील कुलदीपसिंग सेंगर आणि इतर अनेकांवर पीडितेच्या वडिलांच्या हत्येच्या आरोपाची चौकशी सीबीआय करीत होती. या प्रकरणात कुलदीप सेंगर, त्याचा भाऊ अतुल, अशोकसिंग भदौरिया, उपनिरीक्षक कामता प्रसाद, कॉन्स्टेबल आमिर खान आणि इतर सहा जणांवर कोर्टाने आरोप निश्चित केले होते.
या प्रकरणातील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इतर बाबींसह दिल्लीला हस्तांतरित करण्यात आली. या प्रकरणात सीबीआयने आरोप सिद्ध करण्यासाठी पीडित मुलीचे काका, आई, बहीण आणि वडिलांच्या सहकाऱ्यांसह ५५ साक्षीदारांची विधाने नोंदविली, तर बचावासाठी नऊ साक्षी उपस्थित केली. सीबीआयच्या म्हणण्यानुसार ३ एप्रिल २०१८ रोजी पीडितेचे वडील आणि आरोपी शशी प्रताप सिंह यांच्यात भांडण झाले. कोर्टाने २० डिसेंबर २०१९ रोजी आमदार कुलदीपसिंग सेंगर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली