सांगलीची दिव्यांग गिर्यारोहक काजल सर करणार किलीमांजारो शिखर, ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज’ने केले अर्थसहाय्य

पुणे, २४ फेब्रुवारी २०२३: सांगलीची दिव्यांग गिर्यारोहक काजल दयानंद कांबळे हिने दिव्यांग असूनही अनेक पराक्रम रचले आहेत. यावर्षीही ती पुन्हा एक नवीन पराक्रम रचण्यासाठी सज्ज झाली आहे. तो म्हणजे दक्षिण आफ्रिकेचे सर्वोच्च शिखर किलीमांजारो सर करण्याचा पराक्रम. मात्र, यासाठी तिला मोठ्या प्रमाणावर आर्थिक गरज लागणार आहे. यासाठी ६,७४,०००/- रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. घरच्या परिस्थितीमुळं तिला हा खर्च करणं अशक्य असून परवडणार नाही. तिची ही समस्या पाहून पुण्यातील ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज’ने तिला लागणारा हा संपूर्ण खर्च उचलला आहे.

यावेळी तिने आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीजचे आभार मानले. आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज बद्दल बोलायचं झालं तर कंपनी सातत्याने अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमांमध्ये अर्थसहाय्य करण्याचं काम करत असते.

काजलच्या या मोहिमेबद्दल बोलायचं झालं तर अफ्रिकेतील सर्वात उंच व जगातील चौथ्या क्रमांकाचे उंच पर्वत किलीमांजारो हे कोणत्याही पर्वतरांगेत नसून तो ज्वालामुखींपासून तयार झालेला पर्वत आहे. काजल दक्षिण आफ्रिका येथील हे सर्वोच्च व अवघड शिखर माऊंट किलीमांजारो (शिखर ऊंची १९३४१ फुट उंच असून ५९५१ मीटर आहे). ८ मार्च २०२३ रोजी जागतिक महिला दिनी सर करून आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखरावरून भारताचा तिरंगा फडकवणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा