सांगोला (सोलापूर), दि. २१ जून २०२० : सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात अवैधरित्या वृक्षतोड करून विनापरवाना आणलेले सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सागवानी लाकूड सांगोला वन परिक्षेत्र कार्यालयाकडून जप्त केले. ही कारवाई सांगोला शहरातील पटेल सॉ-मिलमध्ये १९ जून रोजी करण्यात आल्याने वृक्षतोड करणा-यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
सांगोला वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बाठे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल शंकर शिंदे, वनपाल खांडेभराड, वनरक्षक धनंजय देवकर, वनरक्षक तुकाराम बादणे यांनी ही कारवाई केली. तालुक्यात अवैधरित्या वृक्षतोड सुरू असून विनापरवाना सॉ-मिलमध्ये सागवानी लाकूड वापरले जात असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांगोला शहरातील पटेल सॉ. मिलवर छापा टाकून ५० हजार रुपये किमतीचे सागवानी लाकूड जप्त केले. याबाबत पटेल सॉ मिल मालकाची चौकशी सुरू आहे असे वनपरिक्षेत्र आधिकारी यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील