संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण

92

भोर : महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज झाला. या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे ३६ मंत्री शपथ घेणार आहेत. काँग्रेसच्या कोट्यातून शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची नावे समोर आली असून ८ कॅबिनेट व दोन राज्यमंत्री शपथ घेणार आहेत. परंतु या यादीमध्ये पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे भोर-वेल्हा विधानसभेचे आमदार संग्राम थोपटे यांचं नाव सामील करण्यात आले नाही. काँग्रेसने घेतलेल्या या निर्णयामुळे संग्राम थोपटे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे भोर-वेल्हा विधानसभेचे आमदार संग्राम थोपटे यांचं नाव मंत्रिपदाच्या यादीत नसल्याने त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. समर्थकांकडून काँग्रेसच्या निषेधाचा काळा फ्लेक्स बनवून तो पेटवून देण्यात आला आहे. तर काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला जात आहे. तर भोर नगरपालिकेच्या सर्व २० नगरसेवकांसह शेकडो पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. तर नगरपालिकेत एकहाती सत्ता असल्याने स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याचे ही जाहीर केलं आहे. जवळपास भोर वेल्हा मुळशीमधील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा