शाळांमध्ये स्वच्छता आणि सॅनिटायझेशन

3

पुणे, २० जानेवारी २०२१: शिवाजी मराठा हायस्कूल, सरस्वती विद्या मंदिर, गोपाळ हायस्कूल, भावे प्राथमिक शाळा, रेणूका स्वरूप मुलींची शाळा या सर्व शाळांमध्ये स्वच्छता आणि सॅनिटायझेशन करण्यात आले. कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षीच्या मार्च महिन्यापासून सर्वच शाळा बंद होत्या. आता प्रशासनाने शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे.

परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी तो अजून पूर्णपणे संपलेला नाही. विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शाळांमध्ये स्वच्छता आणि सॅनिटायझेशन करण्यात आले. नगरसेवक हेमंत रासने यांनी या कामाची आज पाहणी केली.

हे अभियान नगरसेविका सौ.सुलोचनाताई तेजेंद्र कोंढरे, प्रमोदजी कोंढरे, छगन भाऊ बुलाखे, राजेंद्रजी काकडे, ॲड. राणीताई कांबळे यांच्या वतीने राबवण्यात आला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा