बारामती ,३ ऑक्टोबर २०२० : बारामती शहरात काल शुक्रवार दि.२ ऑक्टोबर “महात्मा गांधी”जयंती निमित्त ‘स्वच्छता अभियानांतर्गत बारामती नगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सार्वजनिक व वर्दळीच्या ठिकाणची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यात आले येथील संपुर्ण परिसराची साफ-सफाई करण्यात आली.
बारामती शहरातील वर्दळीच्या असणाऱ्या (न्यायमंदीर) न्यायालय परिसर,व न्यायालय वसाहत याठिकाणी तसेच बारामती एसटी आगर ,गणेश भाजी मंडई , रुई शासकीय रूग्णालय ,येथे निर्जुंकीकरण औषध फवारणी बी सी सी पावडर फवारणी,सार्वजनिक स्वच्छता गृहांची स्वच्छता,अनावश्यक दगड,मातीचे ढीग उचलण्यात आले तसेच मागील वर्षी देखील याच दिवशी एसटी आगाराची स्वच्छता करण्यात आली मात्र यंदा १०० महिला व पुरुष कामगारांनी मिळून वरील सार्वजनिक ठिकाणी साफसफाई करण्यात आली पालिकेच्या स्वच्छता विभागाचे काम हे नेहमीच चांगले असते आज गांधी जयंतीनिमित्त सफाई कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने स्वच्छता मोहीम राबवली यावेळी भालेराव साहेब (जिल्हा न्यायाधिश,बारामती)प्रसाद देशपांडे , जी .जी.भरणे ,ए.जे.गिरे, व्ही.व्ही.पाटील मॅडम दिवाणी न्यायाधीश तसेच न्यायालय अधिक्षक धार्मिक , एसटी आगर प्रमुख अमोल गोंजारी आरोग्य विभाग प्रमुख सुभाष नारखेडे साहेब, आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे, आरोग्य निरीक्षक अजय लालबीगे उद्यान विभाग प्रमुख विजय शितोळे,मज्जीद पठाण,मुकादम संजय गडीयल उपस्थित होते व आरोग्य विभागाकडील कार्यरत महिला कर्मचारी व पुरुष कर्मचारी तसेच उद्यान विभाग कर्मचारी यांनी स्वच्छता अभियान मोहिमेमध्ये सहभाग घेतला.
न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव