गोल पोस्ट महाराष्ट्र बातम्या मंत्री संजय राठोड यांना मातृशोक

मंत्री संजय राठोड यांना मातृशोक

महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या मातोश्री प्रमिलादेवी दुलीचंदजी राठोड यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने राठोड कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

मातोश्री प्रमिलादेवी या आपल्या सौम्य, धार्मिक व सेवाभावी स्वभावामुळे परिसरात आदराने ओळखल्या जात होत्या. त्यांच्या निधनाने समाजातील एक प्रेमळ, जिव्हाळ्याचे व्यक्तिमत्व हरपले आहे. मातोश्रींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विविध राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून त्यांचा अंतिम निरोप घेत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सचिन झिटे

error: Content is protected !!
Exit mobile version