संजय राऊतांच्या अडचणीत वाढ… आठ ऑगस्टपर्यंत कोठडी…

मुंबई, ४ ऑगस्ट, २०२२ : संजय राऊत यांची कोर्टात सुनावणी झाली. यात ईडी, संजय राऊत, आणि स्वप्ना पाटकर आणि कोर्ट यांच्यात युक्तिवाद झाला. ज्यात संजय राऊत आणि ईडीच्या अधिकाऱ्यांमध्ये वादही झालेत. संजय राऊतांनी कोर्टात अनेक मागण्या केल्या, ज्यात काही मान्य झाल्या तर काही फेटाळल्या.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी संजय राऊत यांची चौकशी सुरु आहेत.संजय राऊतांनी कोर्टात केलेल्या मागण्यांबाबत ईडीला कोर्टाने फटकारलं आहे. यावेळी संजय राऊतांनी सांगितलं की, मला ज्या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे, तिथे योग्य व्हेंटिलेशन नाही. तेव्हा ईडीने सांगितलं की आम्ही त्यांना एसी रुममध्ये ठेवलं असून, संजय राऊतांनी मला पंखा मिळावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार त्यांना आता योग्य व्हेंटिलेशन असणारी रुम दिली जाईल, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

सध्या वर्षा राऊतांची चौकशी सुरु असून त्यांच्या खात्याची चौकशी ईडी करत आहेत. अनोळखी व्यक्तीकडून राऊतांच्या पत्नीला पैसे मिळल्याचे पुरावे ईडीला मिळाले आहेत. पण त्यातही हे पैसे मिळाल्याचं कारण ईडीकडून शोधलं जात आहेत. त्यातही या प्रकरणात ईडीला संजय राऊतांकडून समाधानकारक उत्तरे ईडीला मिळाली नाहीत. ईडीच्या तपासात आणखी काही व्यवहार समोर आले आहेत. तसेच परदेश दौऱ्याच्या खर्चाचे समाधानकारक असं स्पष्टीकरण ईडीच्या आधिका-यांकडून कोर्टाला दिले गेले आहेत. संजय राऊतांना जबाब नोंदवण्यासाठी धमकावलं जात असल्याचं, राऊतांचे वकिल मनोज मोहितेंनी कोर्टाला सांगितलं.

त्याचबरोबर प्रविण राऊत यांच्याकडून संजय राऊतांच्या खात्यात सतत पैसे भरले जात असल्याचं ईडीने सांगितलं. संजय राऊतांच्या इतर लोकांची चौकशी करण्यासाठी आम्हाला वेळ द्यावा, त्यासाठी त्यांना १० ऑगस्टपर्यंत कोठडी द्यावी, असे ईडीच्या अधिकाऱ्यांची मागणी आहे.
संजय राऊतांकडून मला धमकावले जात असल्याचा आरोप स्पना पाटकर यांनी केला. तर कोठडीत असताना संजय राऊत कसे धमकावतील? असा सवाल कोर्टाकडून केला जातोय. यावर स्वप्ना पाटकरांच्या वकिल रणजित नागळे युक्तीवाद सुरु आहे. संजय राऊत हे राजकिय व्यक्तिमत्व असून त्यांच्या निकटवर्तीय लोक आम्हाला धमकावत असल्याचे स्वप्ना पाटकर यांच्या वकिलांनी सांगितले.

यावर आता कोर्टाने आठ ऑगस्टपर्यंत संजय राऊतांना कोठडी सुनावली असून आता संजय राऊतांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. आठ तारखेला संजय राऊतांना दिलासा मिळणार की कोठडीत वाढ होणार, हे सोमवारीच समजेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा