मुंबई : सत्ता स्थापनेबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत उद्या(सोमवारी) राज्यपालांची भेट घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या भेटीत त्यांची सत्तास्थापणेबाबत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. परंतु ही केवळ सदिच्छा भेट असून त्यात कोणताही राजकीय हेतू नाही असे राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
तरी सध्याची शिवसेनेची राजकीय आक्रमकता पहाता ही सदिच्छा भेट नसावी असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.