पुणे: यंदाच्या वर्षी आळंदी येथे संजीवन सोहळ्यानिमित्त पीएमपीएमएलकडून जादा बस गाड्या सोडण्यात येणार आहे.अशी माहिती पुणे परिवहन महामंडळाकडून देण्यात आली आहे. आज(बुधवार) पासून २६नोव्हेंबर पर्यंत १२४जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
संजीवन सोहळ्यासाठी राज्यभरातून भाविक आळंदी येथे दर्शनासाठी येतात. दरवर्षी पीएमपीकडून जादा बसेस सोडण्यात येतात. त्यानुसार यंदाही १२४ जादा बस सोडण्यात येणार आहे.










































