दिल्लीतील शेतकरी आंदोलनात संत बाबा रामसिंग यांनी गोळी झाडून केली आत्महत्या

नवी दिल्ली, १६ डिसेंबर २०२०: दिल्ली सीमेवर शेतकर्‍यांचं आंदोलन कृषी कायद्याविरूद्ध कायम आहे. कृषी कायदे मागे घ्यावे या मागणीसाठी शेतकरी २१ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर धरणेवर बसले आहेत. सिंधू सीमेवरील शेतकरी धरणेत सामील झालेल्या संत बाबा रामसिंग यांनी स्वतःला गोळी झाडून घेतली आहे. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे.

काय आहे सुसाईड नोटमध्ये

संत बाबा रामसिंग यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या नोट मध्ये लिहिलं की, त्यांनी शेतकर्‍यांचं दु: ख पाहिलं. त्यांचे हक्क घेण्यासाठी ते रस्त्यावर उतरले आहेत. हे खूप वाईट आहे. सरकार न्याय देत नाही. हा एक प्रकारचा अत्याचार आहे. दु: ख भोगण्यास लावणं हेदेखील एक पाप आहे. रामसिंह पुढं लिहितात की, ‘कोणीही शेतकऱ्यांच्या बाजूनं व दडपणाविरूद्ध काहीही केलं नाही. अनेकांनी आपल्याला मिळालेले सन्मान परत केले. हा दडपशाहीविरूद्धचा आवाज आणि शेतकऱ्यांच्या बाजूनं आवाज आहे. वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह.’

गेल्या २१ दिवसांपासून दिल्लीमध्ये शेतकरी नवीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. त्यातच आज सिंधू बॉर्डरवरील शेतकरी धरणेत सहभागी संत बाबा रामसिंग यांनी स्वत: ला गोळी घातली. यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. बाबा रामसिंग हे करनालचे रहिवासी होते. शेतकरी आंदोलनाचा संदर्भ देऊन त्यांनी आपल्या हक्कासाठी आवाज उठविला आहे. संत बाबा राम सिंह हे शेतकरी आणि हरियाणा एसजीपीसीचे नेते होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा