गोल पोस्ट महाराष्ट्र संत रविदास महाराज यांची ६४८ वी जयंती साकोऱ्यात मोठ्या उत्साहात साजरी

संत रविदास महाराज यांची ६४८ वी जयंती साकोऱ्यात मोठ्या उत्साहात साजरी

नांदगाव, नाशिक २५ फेब्रुवारी २०२४ : नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे संत गुरु रविदास महाराज यांची ६४८ वी जयंती सार्वजनिक उत्सव समिती साकोरा यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, संत गुरु रविदास महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रीफळ फोडून अभिवादन करण्यात आले. या वेळी उपस्थितांच्या हस्ते महाआरती करून पेढे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी बाजीराव सुलाने,महेंद्र बोरसे,योगेश पाटील,रामकृष्ण बोरसे, दादा सुलाने, देवदत्त सोनवणे, समाधान ठाकरे, अर्जून सुलाने, रामकृष्ण बोरसे, दिगंबर पवार, दगडू बोरसे, गोटूआप्पा बोरसे, देवबा ठाकरे, शांताराम बोरसे, शिवाजी बोरसे, अर्जुन सुलाने, भाऊराव बोरसे, मच्छिंद्र बोरसे, बाळु बत्तासे, नरेंद्र सुरसे, शांताराम बोरसे, मधुकर सुर्यवंशी, भगवान बोरसे, गुरू पांगुळ, जगदीश शिंदे, गोकुळ बोरसे आदिंसह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनीधी : नाना आहिरे

error: Content is protected !!
Exit mobile version