इंदापूर, दि. २२ जून २०२०: इंदापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीपती कदम विद्यालयाच्या जगद्गुरु श्री. संत तुकाराम महाराज पालखीतळावर देहू संस्थानाचे अध्यक्ष ह.भ.प. माणिक मोरे आणि सिनेअभिनेते, वृक्षप्रेमी सयाजीराव शिंदे, वृक्षप्रेमी रघुनाथ ढोले, नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल तसेच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
रयत शिक्षण संस्थेच्या श्रीपती कदम विद्यालयाच्या प्रांगणात दरवर्षी रिंगण सोहळा होतो. कोरोणा व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यावर्षी पालखी सोहळा दिंडी पायी चालत चालणार नाहीत. पालखी सोहळ्याच्या विश्वस्तांनी ज्याठिकाणी तुकाराम महाराजांची पालखी थांबते त्या त्या ठिकाणी वृक्ष लागवड लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
याठिकाणी पालखी तळावर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून १४ झाडे लावण्यात आली. इंदापूर नगर परिषदेने तयार केलेल्या अटल आनंद घण वन योजनेअंतर्गत वीस गुंठे जागेमध्ये दोन हजार झाडे लावलेले व ती जोपासलेली त्याची पाहणी सिनेकलाकार सयाजीराव शिंदे यांनी केली. लावलेल्या झाडाचे त्यांनी कौतुक केले. अशाच प्रकारे इतर ठिकाणीही आनंद अटल वन सारखा प्रयोग यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सयाजीराव शिंदे यांनी आपले मत व्यक्त केले.
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, नगरसेवक जगदीश मोहिते, पोपट शिंदे, अशोक चिंचकर, सुरेश सोनवणे, अल्ताफ पठाण आणि विश्वस्त सदस्य यावेळी उपस्थित होते.
सोबत फोटो
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे