जाफ्राबाद येथे ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम !

4

जाफ्राबाद, १४ मार्च २०२४ : जाफ्राबाद येथे आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, आ. संतोष पाटील दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

‘शासन आपल्या दारी’ हा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण उपक्रम असून शासनाच्या या महत्वाकांशी कार्यक्रमामुळे आता राज्यासह मतदारसंघातील नागरिकांना सरकारी कार्यालयामध्ये विनाकारण चकरा मारण्याची गरज राहिली नाही. या कार्यक्रमांमध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत योजना, कृषी यांत्रिकीकरण योजना, संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार अंतर्गत विविध योजना, महिला बचत गटांना कर्ज वाटप, शालेय विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप, रमाई आवास योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अशा विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्यात आला.

याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. बद्रीभाऊ पठाडे, उपविभागीय अधिकारी श्री. दयानंद जगताप, तहसीलदार श्रीमती सारिका भगत यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी – कमलकिशोर जोगदंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा