सरकारकडून जनतेला मूर्ख बनवण्याचे काम सुरू आहे: यशवंत सिन्हा

55

नवी दिल्ली : देशाची अर्थव्यवस्था गंभीर संकटांत सापडली आहे. परंतु सरकारकडून मात्र जनतेला मूर्ख बनविण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे सरकारमधील व्यक्ती मात्र जनतेला मूर्ख बनवण्याचे प्रयत्न करत आहेत. पुढील तिमाहीत चांगली परिणती दिसेल असे सांगून ते लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केली आहे.

देशाचा जीडीपी ४.५ टक्क्यांवर घसरल्याचे शुक्रवारी जारी केलेल्या अधिकृत आकडेवारीवरून दिसून आले. साडेसहा वर्षांमधील हा सर्वात नीचांकी स्तर आहे.
संकटनिवारणासाठी आणखी तीन ते चार वर्षे किंबहुना पाच वर्षे लागतील, असेही मत यावेळी यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केले.
अर्थव्यवस्थेवरील संकट जादूची छडी घुमवून दूर करता येणार नाही. सध्या अर्थव्यवस्थेची जी स्थिती आहे. तिला “डेथ ऑफ डिमांड” असे म्हणतात. व शेती, ग्रामीण क्षेत्रापासून ती सुरू होत असते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मागणी घटनांपासून या प्रकारच्या संकटाला सुरुवात होते. किमान ग्रामीण भागात व शेतकऱ्यांसंबंधात जे घडत आहे, त्याबद्दल तरी सरकारने काळजी घ्यावी, असेही सिन्हा यांनी सांगितले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा