काल झालेल्या एका बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाचे नुकसान भरपाई करून देण्यासाठी तात्काळ दहा हजार रुपयांची मदत जाहीर केली होती. परंतु विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारच्या या मदतीला तुटपुंजी असं म्हणतात सरकारने कमीत कमी २५००० कोटी रुपयांची मदत केली पाहिजे होती अशी टीका केली आहे.
माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, “दहा हजार कोटी रुपये ही सरकारने केलेली तुटपुंजी मदत आहे. सरकारने अजूनही शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा पूर्णपणे घेतलेला नाही त्यांनी जाहीर केलेली मदत ही झालेल्या नुकसानाच्या तुलनेत काहीच नाही. शेतकऱ्यांची सरकारने थट्टा चालवली आहे”.