सासवड शहर शनिवार व रविवार राहणार बंद: मुख्याधिकाऱ्यांची माहिती.

पुरंदर दि.३१ जुलै २०२० : सासवड शहरात कोरोना रुग्णांचा वाढता प्रभाव पाहता पूर्णपणे बंद करण्यात आले होते. कोरोना रुग्णांची संख्या थोडी कमी आल्याने या आठवड्यात सासवडची बाजारपेठ पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. मात्र असे असले तरी ही बाजारपेठ आठवड्यातून दोन दिवस म्हणजे शनिवार-रविवार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनोद जळक यांनी दिली आहे.

सासवड शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मा. उपविभागीय अधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, दौड पुरंदर, उपविभाग पुरंदर यांनी दिनांक २६/७/२०२०रोजी दिलेल्या आदेशानुसार (आदेश क्र. आ. व्य, करोनो / एसआर ६६७/२०२०) सासवड शहर पाच दिवस म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार,गुरूवार व शुक्रवार यावारी चालू ठेवून इतर दोन दिवस शनिवार व रविवार बंद ठेवणेबाबत मान्यता दिलेली आहे.

त्यामुळे सासवड शहर शनिवार व रविवार रोजी बंद राहणार आहे.तर शनिवार व रविवार फक्त
दवाखाने, मेडिकल, टेस्टिंग लॅब पूर्ण वेळ तर दुध संकलन व विक्री सकाळी व सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत चालू राहील. सोमवार दिनांक ३ ऑगस्ट, २०२० रोजी रक्षाबंधन असल्यामुळे शनिवार व रविवार या दिवशी फिरत्या स्वरूपाचा राखी विक्रीचा व्यवसाय करता येईल.

सासवड शहरामध्ये शनिवार व रविवार यादिवशी सर्व किराणा दुकाने, शेती विषयक दुकाने,भाजीपाला व फळ विक्री व्यवसाय, सर्व व्यवसायिक दुकाने , हॉटेल, उपहारगृहे, खाद्यगृहे, गॅरेज, बेकरी ,मटन व चिकन दुकाने व इतर सर्व आस्थापना , दुकाने बंद राहतील, याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी.असे आवाहन मुख्य यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे तसेच शासनाचे नियमाचे सर्व नागरीकांनी पालन करावे.

शासनाच्या नियमांचे पालन न केल्यास संबंधितांवर कडक कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही प्रसिद्धी पत्रकात देण्यात आलेला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा