बारामती : सासवड येथे अवैधरित्या असणाऱ्या ऑनलाईन मटका अड्ड्यावर पोलिसांची मोठी कारवाई करण्यात आली.
बारामती कार्यालयातील अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार, सासवड पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणावर दिवसा ढवळ्या ऑनलाइन मटका सुरू असल्याचे समजले होते. या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील PMT बस स्टँड शेजारी सुरू असलेल्या बेकायदेशीर मटका अड्यावर छापा मारला असता यावेळी ऑनलाइन मटका चालवणाऱ्या आरोपी प्रवीण घाटे (मालक) अनिल जाधव,अतिष दळवी,स्वप्नील ढगारे, प्रवीण वंजारी,सुरज निघोड,किरण देवकर,धर्मराज जगताप यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.या कारवाई मध्ये ६५,८५० रुपये रोख ९८,५०० रुपयांचे ४ एलईडी टीव्ही , ७ मोबाइल संच, २ जिओ राऊटर असा एकूण १,६४ ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या धडक कारवाईमध्ये बारामती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पो.हवा. संदिप जाधव, सुरेंद्र वाघ, पो.ना. स्वप्नील अहिवळे, पो.कॉ. विशाल जावळे पो.कॉ. शर्मा पवार, पो.कॉ. नाथ जगताप, योगेश कुलकर्णी, अजित राऊत तसेच सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दगडू हाके पो.कॉ. भाऊसो खाडे हे या कारवाई मध्ये सहभागी होते.