सातारा स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी, दरोड्यातील लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

सातारा १४ डिसेंबर २०२३ : सातारा पोलीस दलाने धडाकेबाज कामगिरी करत, रेकॉर्डवरील टोळीमधील एका आरोपीकडून २३ गुन्ह्यांमध्ये लुटलेला लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दरोडा, जबरी चोरी, लूटमार आणि घरफोड्या प्रकरणे उघडकीस आणत पोलिसांनी, रोहित उर्फ टाक्या पवार रा. सुरवडी ता. फलटण या आरोपीकडून तब्बल ३२ लाख दहा हजार रुपये सोन्या चांदीचे दागिने जप्त केले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या या उल्लेखनीय कामगिरी बद्दल सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पोलीस कर्मचाऱ्यांशी हस्तांदोलन करत त्यांचे कौतुक केले.

पकडलेल्या आरोपीकडून गुन्ह्यांमध्ये सहभाग असणाऱ्या त्याच्या टोळीमधील साथीदारांची नावे निष्पन्न झाली असून, आम्ही त्यांच्या मागावर आहोत असे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी माध्यमांना सांगितले. तसेच लवकरात लवकर जप्त मुद्देमालाबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ते जिन्नस ज्या गोर गरिबांचे आहेत त्यांना परत देण्यात येतील, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ओंकार सोनावले

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा