साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगांना साहित्य वाटप

फलटण, सातारा ५ डिसेंबर २०२३ : पोलीस अधीक्षक समीर शेख, सातारा यांच्या वाढदिवसानिमित्त फलटण तालुक्यातील गोखळी विडणी कुरवली येथील दिव्यांगांना साहित्य वाटप करण्यात आले. फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या हस्ते हे साहित्य वाटप झाले. वाढदिवस म्हटला की हार तुरे मिठाई मोठ्या प्रमाणात देण्यात. परंतु या हार तूऱ्यांवर भेट देणाऱ्याने खर्च करून त्याचा उपयोग काही होत नाही त्यामुळे माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या खर्चाला फाटा देऊन त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना आवाहन केले की, त्यांच्या वाढदिवसानिमित्त कुणीही हार तुरे न आणता दिव्यांग बांधवांसाठी जे मदतीचे साहित्य लागते ते त्यांना भेट म्हणून द्यावे.

त्यांच्या आवाहनानुसार सातारकरांनी त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये व्हीलचेअर कमोड, श्रवण यंत्र तसेच इतर दिव्यांगांसाठी उपयुक्त साहित्य मोठ्या प्रमाणामध्ये भेट दिली. साहेबांनी दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थांकडून दिव्यांग बांधवांसाठी कोणत्या साहित्याची गरज आहे याची यादी मागवली आणि लोकांकडून आलेल्या दिव्यांगांसाठीच्या साहित्याची भेट या दिव्यांग बांधवांना देण्यात आली.
पोलीस अधीक्षक समीर शेख यांना लक्षात आले की, छोट्या गावामध्ये अनेक दिव्यांग लोक असतात ते उघड्या नागड्या पायांनी फरपटत ओबडधोबड रस्त्यावरून चालत असतात, परंतु त्यांच्यासाठी व्हील चेयर सारखा चांगला पर्याय उपलब्ध आहे. कमोड सारखा अतिशय सोपा पर्याय उपलब्ध असताना सुद्धा तो त्यांच्यापर्यंत न पोहोचल्याने दिव्यांगाना कष्टप्रद वेदना सहन कराव्या लागतात. दिव्यांगांना परमेश्वराने अतिशय कुशाग्र बुद्धी दिलेली आहे. सदृढ मनुष्य प्रमाणे सर्व कामे ते करू शकतात. त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाने त्यांच्या अपंगत्वावर मात करून सुदृढ व्यक्तीच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी चे साहित्य निर्मिती केलेली आहे. त्यामुळे असे साहित्य दिल्याने दिव्यांग आता दुसऱ्यावर अवलंबून न राहता ते समाजाची सेवा करत आहेत.

खऱ्या अर्थाने त्यांचा वाढदिवस हे साहित्य वाटपाने सार्थकी लागलेला आहे. दिव्यांगांना कोणतेही कष्ट होऊ नये म्हणून त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिव्यांगांसाठी जे साहित्य जमा झालेले आहेत ते त्यांच्या घरी जाऊन त्यांना द्यावे असे सांगितले. फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक व त्यांचे सहकारी यांनी कुरवली, वेडणी, गोखळी या गावातील दिव्यांगांच्या घरी जाऊन व्हील-चेअर कमोड, श्रवण यंत्र यांचे वाटप केले.

न्युज अनकट प्रतिनीधी : आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा