सातारा : मद्यपान करुन रुग्णांवर उपचार करणार डॉक्टर तुम्ही कबीर सिंह या सिनेमात पाहिला असेल. पण अशीच घटना साताऱ्यात प्रत्यक्षात घडली आहे. सरकारी रुग्णालयातील एका डॉक्टरने दारुच्या नशेत रुग्णावर उपचार केले. एवढंच नाही तर रुग्णाला काही झालं तर स्वत:ची मान कापून देईन, असंही म्हटलं.
माण तालुक्यातील दहिवडी गावाता एक महिलेला साप चावला. उपचारांसाठी महिलेला नातेवाईकांनी सरकारी रुग्णालयात दाखल केले. पण तिथे असलेल्या एका डॉक्टरने मद्य प्राशन केल्यामुळे नशा चढली होती. या नशेतच संबंधित डॉक्टरने महिलेवर उपचार केले. बरं एवढ्यावरच तो थांबला नाही. तर तिला काही झाल्यास मी माझी मान कापून देईन, असंही तो बोलला.रुग्णालयात मद्य प्राशन करुन उपचार करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मद्य प्राशन करुन दवाखान्यात त्याला उपचार करु कोणी दिले? प्रशासनाने याची दखल लवकरात लवकर का घेतली नाही? आणि सर्वात महत्त्वाचे महिलेला उपचारादरम्यान काही इजा झाली असती तर कोण जवाबदार ?असे अनेक प्रश्न उपस्थित होतात तर दुसरीकडे या सर्व प्रकारामुळे दहिवडी इथल्या सरकारी रुग्णालयात सुरु असलेल्या कारभाराचा पर्दाफाश झाला आहे.