लडाख, दि. २६ मे २०२०: लडाखमधील सीमेवर अनेक ठिकाणी भारत आणि चीनचे सैन्या गेल्या दोन दिवसापासून आमने सामने आहेत. दोन्ही देशांतील सैन्यामध्ये सीमा वादावरून चर्चादेखील झाली आहे. परंतू त्या चर्चेचा प्रत्यक्ष कोणताही फायदा झालेला दिसत नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, अशा परिस्थितीत भारतीय सैन्य वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) सीमा वादावरून निर्माण होत असणाऱ्या वादास प्रतिकार करण्यास दिर्घकाळासाठी तयार आहे. दोन्ही देशांचे सैन्य आपली तैनात संख्या वाढवत आहे. दोन्ही बाजूंच्या अगदी थोड्या अंतरावर एक हजाराहून अधिक सैनिक उपस्थित आहेत.
यूरोपीयन स्पेस एजेंसी च्या वतीने घेण्यात आलेल्या सॅटेलाइट चित्रांमध्ये पँगोंग तलावाजवळील आयटीबीपी केम समोर चिनी सैनिकांची होत असलेली तयारी स्पष्टपणे दिसून येत आहे. गेल्या एका महिन्याच्या चित्रांशी तुलना केली असता, या कालावधीत एलएसीच्या दुसऱ्या बाजूला चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) च्या हालचाली उघडकीस आल्या आहेत. २४ मे रोजी झालेल्या छायाचित्रांच्या विश्लेषणामध्ये आयटीबीपीच्या छावणीपासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावर छोट्या बोटी वापरुन चिनी सैन्यांची संभाव्य हालचाल दिसून येते.
छायाचित्रांच्या ऐतिहासिक विश्लेषणावरून असे दिसून येते की सीमेच्या या बाजूस आयटीबीपीचे कित्येक वर्षांपासून कायमस्वरुपी शिबिरे आहे. हे फोटो एलएसीपासून सुमारे २.५ किमी अंतरावर चिनी सैनिकांची उपस्थिती दर्शवितात. मे २०२० च्या पहिल्या आठवड्यात घेतलेल्या चित्रांमध्ये ही उपस्थिती दिसली नाही.
चिनी घुसखोरी
असेही वृत्त आहे की चिनी लोकांनी भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतू भारतीय सैनिकांनी त्यांना रोखले. पाच मे रोजी पूर्व लडाखमध्ये भारतीय सैन्य आणि चिनी सैन्य समोरासमोर आले होते. ५ मे रोजी सुरू झालेला तणाव ६ मे रोजी पर्यंत कायम राहिला होता. गॅल्व्हन व्हॅली आणि पँगाेंग लेकच्या आसपासचे भाग तणावाचे ठिकाण बनले आहेत. या भागांत सैन्यामध्ये तणाव कायम आहे व हा तणाव घटण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. चीनने अलीकडे सैन्याच्या तैनाती वाढवलेल्या पूर्व लडाख आणि गालवान व्हॅली प्रदेशातील पँगोंग त्सो सेक्टरमध्ये बारकाईने नजर ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी