नवी दिल्ली, ३१ जानेवारी २०२१: भारत आणि चीन सीमेवरील वाद अजूनही चालू आहे. मागच्या वर्षी जून महिन्यात भारतीय सैन्य सोबत चिनी सैन्याची हिंसक झडप झाली होती. त्यानंतर सीमेवर चीनची हालचाल वाढली होती. यादरम्यान सॅटेलाइट फोटो मधून सिक्कीम मधील नाकु लाजवळ नवीन रस्ते व नवीन पोस्ट तयार केल्याचे निदर्शनास आले. दोन्ही सैन्यांमध्ये झडप देखील झाली. अलीकडेच याच भागात भारत आणि चिनी सैन्य समोरासमोर आले होते. तसेच दोन्ही सैन्यांत किरकोळ झडप देखील झाली होती. मात्र, स्थानिक कमांडरस् नी स्थापित प्रोटोकॉल नुसार या प्रकरणाचा तोडगा काढला.
नाकु लाच्या उत्तरेकडील भागात असलेल्या डोकलाममध्ये २०१७ च्या वादानंतर पहिल्यांदाच येथे चिनी कार्यात वाढ झाली. लडाखच्या स्टँडऑफचे विश्लेषण करणार्या उपग्रह छायाचित्रांमधून पीएलएचा हेतू समजला जाऊ शकतो. जून २०२० आणि सप्टेंबर २०२० मधील उपग्रह फोटोंच्या तुलनेत, चीनी प्रदेशात बनविलेले नवीन रस्ते नाकू ला जवळ स्पष्टपणे दिसतात. या चित्रांमधून चिनी बांधकाम उघडकीस आले आहे.
तटबंदीसारखी रचना उपग्रह फोटोंमध्ये दिसते आणि ती सीमेजवळील भागातही दिसते. तज्ञांचे मत आहे की हे स्पॉट्स तात्पुरते निवारा असू शकतात. त्यांचा उपयोग लष्करी वाहने पार्क करण्यासाठी केला जाऊ शकतो. चीन नाकू ला पासून उत्तर – पूर्व मध्ये जवपास ३० किमी अंतरावर एक भव्य सैन्य चौकी बनावट असताना देखील दिसत आहे.
या तंत्रा चा पहिल्यांदा वापर अमेरिकेतील जिओ इंटेलिजन्स फर्म Hawkeye 360 द्वारा केला गेला होता. ज्यामधे ऑगस्ट २०२० मध्ये आर एफ सिग्नल्स ला मॅप केले गेले होते. Hawkeye 360 चे एक विश्लेषक क्रिस बिगर्स यांनी सांगितले की, या भागात पहिली तैनाती जुलै २०२० मध्ये झाली असावी. पण हे स्थान डोकलाम स्टँड ऑफ नंतर ॲक्टिव झाले आहे.
नोव्हेंबर २०२० मध्ये स्पेस फर्म प्लॅनेट लॅबने घेतलेल्या उच्च रिझोल्यूशन उपग्रह इमेज या स्थानाबद्दल महत्त्वाचे तपशील प्रदान करतात. उत्तर बाजूने पीएलएच्या चिलखत वाहनांच्या संभाव्य बटालियनची तैनातीही पाहिली गेली. या इमेज मध्ये कॅम्पच्या जागेजवळ तोफखान्यांची तैनातीही दिसून येते. बिगर्स यांनी सांगितले की ही साइट जानेवारी २०२१ पर्यंत कायम आहे.
सप्टेंबर २०२० पर्यंत नाकू ला बॉर्डरजवळ उपग्रह छायाचित्रांचा आणखी एक संच पर्वताच्या शिखरावर भारतीय सैन्याची उपस्थिती दर्शवतो. प्रतिस्पर्ध्याचा सामना करण्याची ही योजना दिसते आहे. यापैकी काही ठिकाणांची अंदाजे उंची ५०० मीटरपेक्षा जास्त आहे, जी अत्यंत धोकादायक आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे