इंदापूर, दि. १४ जुलै २०२०: गतवर्षी इंदापूर तालुक्यातील पर्जन्यमान मागील काही वर्षांच्या तुलनेत अधिक पटीने वाढ झाली आहे. समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. ऊस लागवडीसह पावसावर अवलंबून असणा-या पिकांची लागवड करण्यात शेतकरी व्यस्त आहेत.
मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा सरासरी ५० मिमी हुन अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. यंदा सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली असल्याची माहिती आहे.
तसेच या पावसामुळे जमिनीतील पाणी पातळी वाढण्यास देखील मदत होणार आहे. त्यामुळेच उन्हाळ्यात देखील पाण्याची टंचाई भासणार नसल्याचे भाकीत शेतकरी वर्तवित आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे