नीरा खोऱ्यात समाधानकारक पाऊस, शेतकरी सुखावला

पुरंदर, दि. २६ जून २०२० : पुणे जिल्ह्यातील भोर, पुरंदर, बारामती, इंदापूर, सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण, तर सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांची जिवनदायनी असलेली नीरा नदी व नदीवरील धरणांची आजची स्थीती समाधानकारक आहे. गेल्या वर्षी जूनच्या सुरवातीलाच नीरेच्या खोऱ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. मागील दोन दिवसांपासून या खो-यांमध्ये पाऊस पडू लागला आहे. आज २६ जून पहाटे पासून पावसाने जोरात बॅटिंग केली आहे. त्यामुळे धरण क्षेत्रातील पाण्याची पातळी वाढत आहे. तर समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकरी सुखावला आहे. नीरा खोऱ्यात आज रात्री उशिरापर्यंत पडलेल्या पावसाची माहिती अभियंता विजय नलवडे यांनी दिली आहे.आज नीरा खोऱ्यातील पुणे जिल्ह्यातील गावांमध्ये पडलेल्या पाऊस मिलिमीटरमध्ये खालील प्रमाणे.

पाऊस (२६ जून २०२०)
पुणे पाटबंधारे विभाग पुणे
निरा डावा कालवा
भाटघर. = ८.
निरादेवघर. = ९.
विर. = १८.
गुंजवणी. = २.
पिंपरा. = ३३.
वडगाव. = ६४.
मा.वस्ती. = १०६.
पणदरे.बं = ९०.
माळेगाव कॉ. = ६५.
बारामती. = 55.
सनसर. = ३६.
अंथुर्णे. = ३८.
निमगाव. = ३८.
बावडा. = ४२
नाझरे. = १४.

आज नीरा खोऱ्यातील सातारा जिल्ह्यातील गावांमध्ये पडलेल्या पाऊस मिलिमीटरमध्ये खालील प्रमाणे.
पाऊस (दि. २६ जून २०२०)
निरा उजवा कालवा
विर = १८
फलटण = २७
निंबळक = ५२
धर्मपुरी = ८२
नातेपुते = १०५
माळशिरस = १०३
वेळापूर = ४४
अकलूज = ९२
महळुंग = एन. आर .
भलवीन = ७८
पंढरपूर. = ०८
म्हसवड. = ९६

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा