बेळगाव जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदी सतीश जारकीहोळी ; तर विजयनगरच्या पालकमंत्रीपदी लक्ष्मी हेब्बाळकर यांची नियुक्ती

बेळगाव, ३ जून २०२३: बेळगाव जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदी अखेर अपेक्षेप्रमाणे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांची नियुक्ती झाली आहे, तर बेळगाव ग्रामीण आमदार आणि महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची विजयनगर जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

बेंगलोरहून हा आदेश आज सकाळी जारी करण्यात आला. सर्व ३१ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार विजापूरच्या पालकमंत्रीपदी एम बी पाटील, बागलकोटच्या पालकमंत्रीपदी शिवानंद पाटील तर कारवारच्या पालकमंत्रीपदी मंकाळू वैध यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.

धारवाड जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदांची जबाबदारी संतोष लाड यांच्यावर सोपवण्यात आली आहे. जेष्ठ मंत्री के जे जॉर्ज हे बेंगलोरचे पालकमंत्री असतील. ही घोषणा आज सकाळी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा