कर्जत जामखेड: नुकतेच झालेले आमदार रोहित पवार यांनी फेसबुक वर एक पोस्ट टाकली आहे त्यात ते म्हणाले आहेत की, “आपल्या आनंदामुळे अगदी एका व्यक्तीला जरी वाईट वाटलं, तरी आपण त्या एका व्यक्तीचा विचार करायला हवा हेच मी लहानपणापासून शिकलो. कालचा दिवस हा माझ्यासाठी कर्जत जामखेड च्या सर्वसामान्य मतदारांसाठी विशेष होता. कर्जत-जामखेड हे माझं घर आहे असे मी मानत आलेलो आहे”.
त्यात मांडले आहे की, मी विजयी झाल्यानंतर पहिल्यांदा जामखेड मध्ये पोहोचलो, विजयानंतर पहिल्यांदाच पोहोचल्या नंतर समजलं की लोकांनी उत्साहात माझी मिरवणूक काढण्याचा ही तयारी केली आहे. हे लोक म्हणजे नेमके कोण? तर माझा विजय व्हावा म्हणून गेले सहा सात महिने रात्रीचा दिवस करणारी माझी हक्काची माणसं अगदी दहा रुपये गोळा करून त्यांनी गुलाब आणला आहे. यात जशी सामान्य माणसं होती तशीच जेसीबी असोसिएशनचे लोक देखील होते त्यांनी आमच्या पद्धतीने तुमचा सत्कार करू असा आग्रह धरला होता.