सौदी अरेबियाचं ऐतिहासिक पाऊल…

सौदी अरेबिया, 5 जुलै 2022: सध्याचं युग हे पुरुष आणि महिला या दोघांचे आहे. पण याला अरब देश अपवाद होता. पण याच अरब देशांनी आता विकासाच्या दिशेने पाऊल पुढं टाकलं आहे. नुकतीच पंतप्रधान मोदी यांनी अरब देशांना भेट दिली होती. आता याच अरब देशाने आपली छवी बदलायचा प्रयत्न केला आहे. सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय. त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात दोन महिलांना स्थान दिलं आहे.

पहिली महिला उपसचिव आणि पर्यावरण मंत्री या दोन पदांसाठी या महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिहाना अलजाज यांची उपसचिव पदी तर हाइफा बिन्त मोहम्मद अल सऊद यांना पर्यावरण मंत्री म्हणून घोषित केलं.

जिथं महिलांवर अत्याचार, बंधन असतात त्या ठिकाणी महिलांवर एक नवी जबाबदारी टाकून महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न सौदी अरेबियामध्ये केला जात आहे. हिजाबच्या ठिकाणी महिला आता ॲक्शन मोडमध्ये येत आहे. हे आता सौदी अरेबियातल्या घडामोडींवरुन दिसून येत आहे. आता सौदी अरेबियाचं चित्र बदलेल हे नक्की.

न्यूज अनकट प्रतिनिधी-तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा