Savitribai Phule Pune University Girls Hostel: शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुन्हा एकादा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुलींच्या वसतिगृहात मुलींकडून मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन आणि धूम्रपान केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे विद्यापीठ परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. वसतिगृहात राहत असलेल्या एका विद्यार्थीनीनेच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत अशी माहिती समोर आली आहे की, पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात मोठ्या प्रमाणात धूम्रपान आणि मद्यप्राशन केले जात आहे. यासंदर्भात वसतिगृहात मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या आणि सिगरेटच्या पाकीटाचे फोटो समोर आले आहे.


याबाबतची तक्रार विद्यार्थिनीने वारंवार हॉस्टेलच्या रेक्टर अधिकाऱ्यांकडे केली होती. परंतु,संबंधित अधिकऱ्यांकडून कोणतीही कारवाई किंवा दखल घेतली गेली नाही. याशिवाय या संपूर्ण प्रकरणाबाबत विद्यार्थिनीने प्रभारी कुलसचिव आणि कुलुगरू यांना लेखी अर्ज सुद्धा केला होता. विशेष बाब म्हणजे तक्रार करून सुद्धा विद्यापीठाच्या प्रशासनांकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे.या संपूर्ण प्रकरणात विद्यापीठाकडून कोणतेही पाऊल उचलले जात नसल्याने पीडित तरुणीने याबाबतची माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष आदित्य रवींद्र डुंबरे यांना सांगितली.


याबबात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून कठोर भूमिका घेण्यात आली आहे. ABVP अध्यक्ष आदित्य डुंबरे यांनी सांगितले की, मागच्या सहा महिन्यांपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अमली पदार्थ सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. या विद्यार्थीनीने वारंवार प्रशासनाकडे व कुलगुरूंकडे तक्रार करून देखील या विद्यार्थिनीला न्याय मिळवून देण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे वसतिगृह प्रशासन अपयशी ठरले आहे.आम्ही विद्यापीठाच्या कुलसचिवांना निवेदन दिले आहे. “पूढील आठ दिवसांत पीडित तरुणीला न्याय मिळवून दिला नाही तर आम्ही आंदोलन करू” अशी माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षांनी दिली. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नेमक चाललय तरी काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर