“तु क्या गुंडा बनेगा रे” म्हणत वसीम ने इंग्लंड संघाला डिवचले

नवी दिल्ली, ८ जून २०२१: इंग्लंड-न्यूझीलंड मध्ये कसोटी सामन्यांची सिरीज खेळली जात आहे ज्या मध्ये पहिल्या कसोटी सामना हा अनिर्णित राहिला. ज्या माजी क्रिकेटपटू वसीम जाफर यांनी फार गंमतीशीर पणे इंग्लंड ची फिरकी घेतली आहे. जो सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालताना दिसतोय.
वसीम जाफर यांनी हेराफेरी चित्रपटामधील एक मीम शेयर करत इंग्लंड ची फिरकी घेतली. ज्या “तु क्या गुंडा बनेगा रे” हा फोटो त्यांनी शेयर केला. ज्यानंतर सर्वत्र ही पोस्ट कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली आणि मग सोशल मीडियावर इंग्लंड संघाची मजा घेण्यास सुरुवात झाली.
वसीम जाफर यांनी म्हटलं “जर तुम्ही घरच्या मैदानावर षटकात ३.६ च्या सरासरीने लक्ष्यचा पाठलाग करु शकत नाही, ज्यात WTC चा गुण जोडला जात नाही,तर कसे होईल? टेस्ट क्रिकेटसाठी ही चांगली जाहीरात नाही.” असे त्यांनी लिहले. या सोशल मीडियावरील जुगलबंदी हि वसीम जाफर आणि इंग्लंड चे पुर्व कॅप्टन माइकल वाॅन यांच्यात चालू आहे.
माइकल वाॅन यांनी एका मुलाखती मधे भारताच्या माजी क्रिकेटपटू वसीम जाफर यांना सोशल मीडियावर बँन करण्याचे वक्तव्य केले होते.ज्यानंतर आता वसीम ने अश्या प्रकारे त्याचे उत्तर दिले. असे अनेक नेटकर्यांनी म्हटलं आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा