नेस वाडिया महाविद्यालयातर्फे डॉ.नौशाद डी.फोर्ब्स यांना ‘स्कॉलर ऑफ दी ईअर अवार्ड’

पुणे, दि.१६ जुलै २०२० :  मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या ‘नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स’ च्या वतीने देण्यात येणारा ‘स्कॉलर ऑफ दी ईअर अवार्ड’ फोर्ब्स मार्शल प्रा. लिमिटेडचे उपाध्यक्ष डॉ. नौशाद फोर्ब्स यांना जाहीर झाला आहे. ‘नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स’ च्या प्राचार्य डॉ.गिरीजा शंकर, उपप्राचार्य डॉ प्रकाश चौधरी यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.  महाविद्यालयाच्या ५२ व्या वर्धापन दिवसानिमित्त हा सन्मान दरवर्षी दिला जातो. हा वर्धापन दिन  गुरूवार, दिनांक १६ जुलै,२०२० रोजी सायंकाळी ५ वाजता साधेपणाने ऑनलाईन प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी महाविद्यालयातर्फे फोर्ब्स मार्शल प्रा. लिमिटेड चे उपाध्यक्ष डॉ. नौशाद फोर्ब्स यांना ‘स्कॉलर ऑफ द ईयर अवॉर्ड’ हा पुरस्कार या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन कळमकर यांच्या हस्ते झूम मिटिंग मध्ये अनौपचारिकरित्या प्रदान करण्यात येणार आहे.

वाणिज्य, अर्थशास्त्र, वित्त व्यवस्थापन व व्यावसायिक शिक्षण या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तज्ञ व्यक्तीस दरवर्षी महाविद्यालयातर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. याप्रसंगी डॉ. नौशाद डी फोर्ब्स यांचे ‘भारत नेतृत्व करेल काय ?’ या विषयावर झूम आणि फेसबुक लाईव्ह च्या ऑनलाईन माध्यमातून सायंकाळी पाच  वाजता व्याख्यान आयोजित केले आहे.

१९६९ साली स्थापन झालेले नेस वाडिया कॉलेज हे पुण्यातील वाणिज्य शाखेतील एक प्रतिष्ठित महाविद्यालय आहे. वाणिज्य क्षेत्रातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम येथे शिकविले जातात. ५ हजार पेक्षा जास्त विद्यार्थी येथे शिकतात, अशी माहिती या पत्रकात देण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा