नवी दिल्ली, १५ सप्टेंबर २०२२: शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) चे नेते कोविडनंतर प्रथमच अमाने सामने बैठकीला उपस्थित आहेत. १४ ते १६ सप्टेंबर दरम्यान समरकंद, उझबेकिस्तानमध्ये होणाऱ्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पोहोचू शकतात. उझबेकिस्तानमधील इंडिया क्लब ताश्कंदने त्यांच्या सन्मानार्थ उझबेक कारागिरांकडून एक विशेष कार्पेट विणले आहे. या कार्पेटवर पीएम मोदींचा चेहरा कोरण्यात आला आहे.
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या शेवटच्या दोन बैठका आभासी आणि संकरित पद्धतीने पार पडल्या. कोविडमुळे ही खबरदारी घेण्यात आली. प्रथमच, SCO च्या आठ सदस्य देशांचे नेते २०१९ मध्ये किर्गिस्तानमधील बिश्केक येथे समोरासमोर भेटले. २०२० मध्ये मीटिंग मॉस्कोने आयोजित केली होती आणि २०२१ मध्ये दुशान्बेने आयोजित केलेली मीटिंग हायब्रीड मोडमध्ये झाली.
२००१ मध्ये स्थापन झालेल्या SCO मध्ये एकूण आठ सदस्य देश आहेत. त्यात सुरुवातीपासून चीन, कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानचा समावेश आहे. तर भारत आणि पाकिस्तान २०१७ मध्ये पूर्ण सदस्य झाले. त्याच वेळी, आब्जर्वर कंट्रीप्रमाणे अनेक देश एससीओमध्ये समाविष्ट आहेत. यामध्ये अफगाणिस्तान, बेलारूस आणि मंगोलियाचा समावेश आहे. तर कंबोडिया, नेपाळ, श्रीलंका, तुर्की, आर्मेनिया आणि अझरबैजान हे या संघटनेचे संवाद भागीदार आहेत.
कोविडनंतर पहिल्यांदाच भेटणार दिग्गज
कोविडनंतर पंतप्रधान मोदी, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबेझ शरीफ, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे दोन दिवसीय शिखर परिषदेत सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ असेल. मात्र बदलती जागतिक परिस्थिती, रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांच्या मुख्य बैठकीच्या बाजूला होणाऱ्या द्विपक्षीय चर्चेकडे सर्वांचे लक्ष असेल.
या बैठकीत भाग घेण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग बुधवारी समरकंदला पोहोचले आहेत. पीएम मोदी आणि पुतिन यांच्या भेटीबाबत चिनी मीडियाने काहीही स्पष्ट केलेले नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे