SCO समिट: PM मोदींचे समरकंद येथे आगमन, उझबेकिस्तानच्या पंतप्रधानांनी विमानतळावर केले भव्य स्वागत

समरकंद, १६ सप्टेंबर २०२२: शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) बैठकीत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उझबेकिस्तानमध्ये पोहोचले आहेत. त्यांचे आगमन झाल्यानंतर उझबेकिस्तानचे पंतप्रधान अब्दुल्ला आरिफॉव्ह, मंत्री, समरकंदचे राज्यपाल आणि वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. पंतप्रधान शुक्रवारी सकाळी SCO शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. ते उझबेकिस्तानचे राष्ट्रपती आणि शिखर परिषदेत सहभागी होणार्‍या काही नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठकाही घेणार आहेत.

पंतप्रधानांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. यादरम्यान त्यांची चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय बैठक होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आधीच समरकंदला पोहोचले आहेत.

दौऱ्यावर जाण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी संदेश दिला होता. ते म्हणाले, “उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शवकत मिर्जिओयेव यांच्या निमंत्रणावरून मी समरकंदला भेट देत आहे. मी SCO शिखर परिषदेत स्थानिक, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी, SCO चा विस्तार करण्यासाठी, तसेच संघटनेतील सहकार्य आणखी कसे वाढवता येईल यावर चर्चा करण्यास उत्सुक आहे.

पीएम मोदी म्हणाले, “व्यापार, अर्थव्यवस्था, संस्कृती आणि पर्यटन क्षेत्रात परस्पर सहकार्यासाठी या परिषदेतून अनेक निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.” मी समरकंदमध्ये राष्ट्राध्यक्ष मिर्झीयोयेव्ह यांना भेटण्यास उत्सुक आहे. २०१८ मधील त्यांची भारत भेट मला अजूनही आठवते. २०१९ मध्ये व्हायब्रंट गुजरात समिटमध्येही ते सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. याशिवाय शिखर परिषदेत सहभागी झालेल्या अनेक नेत्यांसोबत मी द्विपक्षीय बैठका घेणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा