कळंब तालुक्यातील पाथर्डी गाव सील

4

कळंब, दि.१५मे २०२० : कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललेला दिसून येत आहे. ग्रीन झोनमध्ये असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केला आहे.

मागील ३७ दिवस उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोनमध्ये होता; परंतु कळंब तालुक्यातील तिघांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्या कारणाने खळबळ उडाली आहे.

कळंब तालुक्यातील पाथर्डी ह्या गावातील पती – पत्नी मुंबईहून गावी आले. त्यांच्या कोरोनाचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले असल्याचे समजताच प्रशासनाने हे गाव सील केले. दरम्यान गावातील सर्व दुकाने बंद करून गावाच्या सीमा देखील सील करण्यात आल्या आहेत.

गावास असणारे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी त्या ठिकाणी भेट देऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात तसेच रुग्णांवर स्थानिक पातळीवर उपचार तातडीने करण्यात यावेत अशाप्रकारच्या सूचना शासकीय अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा