श्रीहरिकोटा, २० मार्च २०२३: ‘इस्त्रो’ तर्फे (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) एलव्ही एमव्हीएम ३ एम ३ या बाहुबली रॉकेटचं दुसरं प्रक्षेपण हे रविवारी (दि.२६) होणार आहे. श्रीहरिकोटा येथून रविवारी सकाळी ९ वाजता या उपग्रहांचं प्रक्षेपण होणार आहे. एलव्ही एमव्हीएम ३ एम २/ वनवेब इंडिया २ असं या मोहिमेचं नाव असल्याची माहिती इस्त्रोने ट्विट करुन दिलीय.
२३ ऑक्टोबर रोजी ‘इस्त्रो’ तर्फे या बाहुबली रॉकेटमधून तब्बल ३६ उपग्रहांचे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथून केलं होतं. ‘एलव्ही एमव्हीएम ३ एम२/वनवेब इंडिया १’ असं या मोहिमेचं नाव होतं. ‘न्यु स्पेस इंडिया लिमिटेड’ आणि ब्रिटनमधील वनवेब या स्टार्टअप कंपनीच्या संयुक्त विद्यमानाने ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतील सर्व उपग्रह कॅप्सूलमध्ये बसविण्यात आलेले आहेत.
आतापर्यंत इस्त्रोने प्रक्षेपित केलेल्या सर्वात वजनदार रॉकेटचा हा दुसरा टप्पा आहे. या मिशनमध्ये वापरण्यात आलेलं रॉकेट हे सर्वात वजनदार असल्यानं त्याला बाहुबली रॉकेट असं म्हटलंय. या रॉकेटचा वापर पहिल्यांदाच व्यावसायिक प्रक्षेपणासाठी करण्यात येत आहे. वनवेब ही एक खाजगी उपग्रह कंपणी आहे. या प्रक्षेपणासह न्यु स्पेस इंडिया लिमिटेड या आपल्या व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपण बाजारामध्ये पाऊल टाकलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर