हिवाळ्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता: निती आयोग

नवी दिल्ली, १९ ऑक्टोबर २०२०: कोरोना विषाणूमुळे देशात हाहा:कार माजला आहे. दररोज कोरोना विषाणूची नवीन प्रकरणे समोर येत आहेत. तथापि, गेल्या तीन आठवड्यांपासून कोरोना विषाणूच्या नवीन घटनांमध्ये आणि मृत्यूची संख्या घटली आहे. त्याच बरोबर, नीति आयोग म्हणतोय की कोरोना विषाणूच्या संसर्गाची दुसरी लाट ही हिवाळ्यामध्ये देखील येण्याची शक्यता आहे.

नीति आयोगाचे सदस्य व्ही के पॉल म्हणाले की, गेल्या तीन आठवड्यांत कोरोना विषाणू आणि मृत्यूच्या आकडेवारीत घट झाली आहे. हा साथीचा रोग देशातील अनेक राज्यात पसरला आहे. तथापि, हिवाळ्याच्या मोैसमात कोरोना संक्रमणाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पॉल देशातील साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी प्रयत्नशील समन्वय समितीचे प्रमुख आहेत. ते म्हणाले की एकदा कोरोनाची लस उपलब्ध झाल्यावर, त्या वितरित करण्यासाठी तसेच ती नागरिकांना उपलब्ध होण्याइतकी संसाधने उपलब्ध होतील.

पॉल यांनी मुलाखतीत पीटीआयला सांगितले की, “गेल्या तीन आठवड्यांत भारतात कोरोना विषाणूच्या नवीन घटनांमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या घटली आहे आणि बहुतेक राज्यांत साथीचा रोग स्थिर झाला आहे. तथापि, अशी पाच राज्ये आहेत (केरळ, कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल) आणि ३-४ केंद्रशासित प्रदेश, जिथे अजूनही कोरोनाची वाढती प्रवृत्ती आहे.

चांगली स्थिती

पॉल यांच्या मते, भारत सध्या चांगल्या स्थितीत आहे, परंतु देशाचा अजूनही लांब पल्ल्याचा प्रवास बाकी आहे, कारण ९० टक्के लोक अशी आहते जी कोरोना विषाणूच्या संसर्गला बळी पडू शकतात. पॉल म्हणाले की, हिवाळा सुरू होताच युरोपमधील देशांमध्ये कोरोना प्रकरण पुन्हा वाढू लागले आहे.

ते म्हणाले, ‘उत्तर भारतात हिवाळ्याच्या हंगामात तसेच सणासुदीच्या काळात प्रदूषणात काही प्रमाणात वाढ झाली आहे, तर आपण खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. येणारे महिने आव्हानात्मक आहेत. नवीन प्रकरणांची संख्या घटण्याबाबत कोणत्याही आत्मसंतुष्टते विषयी पॉल सावध राहून महामारी थांबविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा