चुरचंदपूर, २८ एप्रिल २०२३: मणिपूरच्या चुरचंदपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळ झाल्याच्या घटनेनंतर आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. येथे मणिपूर सरकारने मोठे मेळावे आणि इंटरनेट सेवा स्थगित केली. वास्तविक मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग चुरचंदपूरला जाणार होते. तेथे त्यांना एका जिमचे उद्घाटन करून, एका जाहीर सभेला संबोधितही करायचे होते.
त्यांच्या भेटीपूर्वीच जमावाने त्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणावर हल्ला करून तोडफोड केल्यानंतर जाळपोळ केली. ही घटना गुरुवारी घडली. यानंतर जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्याबरोबरच कलम १४४ लागू करण्यात आले. घटनास्थळावर जमावाने हल्ला केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि घटनास्थळी पोहोचल्यानंतर जमावाचा पाठलाग केला. मात्र, तोपर्यंत कार्यक्रमस्थळाचे नुकसान झाले होते. त्याचवेळी या घटनेनंतर तणावाचे वातावरण आहे.
चुरचंदपूरमध्ये सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत बंद पुकारण्यात आला होता. यादरम्यान काही संतप्त लोक मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी जोरदार तोडफोड केली. यादरम्यान आग लावण्यात आली असून जिम तसेच सार्वजनिक सभेच्या जागेचेही मोठे नुकसान झाले आहे.
न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड