मुंबई, २१ जानेवारी २०२३ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात काही मोठा कट रचला गेला होता का? त्या दिवशी मुंबईच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होणार होता, जो टळला? पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या ठिकाणाहून दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी एकाकडे घातक शस्त्रे सापडली आहेत. दोन दिवसांपूर्वी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील एमएमआरडीए मैदानावर पंतप्रधान मोदींची सभा झाली होती. मुंबई पोलिसांनी दोन्ही आरोपींना येथून अटक केली आहे. कात्रम चंद्रगाई कावड आणि रामेश्वर मिश्रा अशी या आरोपींची नावे आहेत.
कात्रमचे वय ३९ असून, तो मुंबईला लागून असलेल्या भिवंडी भागातील रहिवासी आहे. तो हॉटेल आणि वाहतूक व्यवसायाशी संबंधित आहे. पीएम मोदींच्या सभेच्या ठिकाणी गस्त घालत असताना पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने त्याला पाडण्यात आले. यावेळी त्याची चौकशी केली. त्याच्याकडून स्मिथ अँड वॅगन स्प्रिंगफील्ड रिव्हॉल्व्हरसह चार गोळ्या जप्त करण्यात आल्या. त्याच्याकडे रिव्हॉल्व्हरचा परवाना असल्याचीही माहिती मिळाली आहे. मुंबई पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बीकेसी पोलिस ठाण्यात कलम ३७ (१), १३५ मापोका १९५१ अन्वये कात्रम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस चौकशी सुरू आहे.
पोलिस चौकशीदरम्यान, आरोपी दावा करीत होता, की तो ‘एनएसजी’च्या पठाणकोट हबमध्ये पोस्टिंगवर आहे; मात्र मुंबई पोलिसांनी तपास केला असता त्याचा आयडी बनावट असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी मिश्राविरुद्ध भादंवि कलम १७१, ४६५, ४६८ आणि ४७१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला २४ तासांची पोलिस कोठडी सुनावली.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड